माथेरानमध्ये पर्यटकांना भासते व्ह्याली क्रोसिंगची उणीव ! 


माथेरान – मुकुंद रांजाणे
माथेरानच्या उंच डोंगरमाथ्यावर येणारे सर्वच पर्यटक हे जरी इथल्या शांतप्रिय वातावरणात आणि शुद्ध शीतल गारव्यात मग्न होत असले तरीसुद्धा अनेकांना करमणुकीसाठी त्याचप्रमाणे निसर्गाशी एकरूप होण्यासाठी काहीच साधन नसल्याने असंतुष्ट दिसत आहेत. यासाठी मागील काळात काही होतकरू युवकांनी पर्यटकांच्या सेवेसाठी सुरू केलेली व्ह्याली क्रोसिंग वनविभागाने बंद केल्यामुळे नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
माथेरानमध्ये एकूण अड़तीस पॉईंटस् पैकी मोजकेच ठराविक काही पॉईंटस् पहाण्याजोगे असून बहुतांश पर्यटक हे पॉईंटस् वरून नैसर्गिक दृष्ये न्याहळीत असतातच. परंतु या डोंगर दऱ्यांच्या सोबत हितगुज साधावे यासाठी सुद्धा ते आतूरलेले असतात.याकामी मागील काळात येथील एको पॉईंटस् तसेच अन्य पॉईंटस् वर व्ह्याली क्रोसिँगची सोय इथल्या होतकरू युवकांनी केल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण झाला होता.पर्यटकांची संख्यासुद्धा या एकमेव आकर्षणामुळे वाढली होती.परिणामी या रोजगाराचे उत्पन्न सर्वश्रुत झाल्यानंतर अनेकांनी याच व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित केल्यामुळे काही पॉईंटस् वर व्ह्यालीच्या रोपांमुळे विद्रुपिकरण व्हायला लागले.त्यातच अंतर्गत मतभेद आणि यामध्ये राजकारण आल्याने या मतभेदांनी अखेरीस या जागा वनविभागांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे हे पर्यटकांच्या करमणुकीचे आकर्षण असलेली व्ह्याली क्रोसिंग वनखात्यामार्फत बंद करण्यात आली.त्यामुळे अनेकांच्या रोजगारांवर , उदरनिर्वाहावर गदा आलेली आहे.व्ह्याली क्रोसिंग बंद केल्यामुळे पर्यटकांची संख्या आपोआपच रोडावली आहे.याचा विपरीत परिणाम एकंदरीत इथल्या पर्यटनावर झालेला दिसून येत आहे.
नुकताच झालेल्या कर्जत -डिकसळ गार्बट पॉईंट मार्गे माथेरान या महत्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पाबाबतच्या विशेष जनसुनावणी बैठकीच्या वेळी नगरपालिका गटनेते प्रसाद सावंत यांनी जर या रोप-वे साठी वरिष्ठ पातळीवर परवानगी मिळत असेल तर याच धर्तीवर माथेरानच्या व्ह्याली क्रोसिंग साठी सुद्धा संबंधित कंपनीने पुढाकार घेऊन व्ह्याली क्रोसिंग हे पर्यटकांच्या आकर्षणाचे साधन सुरू होण्यासाठी लक्ष केंद्रित करावे असे सूचित केले होते.तर हा व्यवसाय सुरू करावयाचा झाल्यास भोपाळ येथील वनखात्याच्या मुख्य कार्यालयाकडुन परवानगी आणावी असे येथील वनखात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे तूर्तास तरी स्थानिक तरुण रोजगाराच्या शोधात मिळेल ती कष्टदायी कामे करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यासाठी झटत आहेत.

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत