माथेरानमध्ये पर्यटकांसह गोविंदा पथकांनी फोडली दहीहंडी!

माथेरान : श्वेता शिंदे 

देशभर जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना गोविंदा पथकही हंडी फोडण्यासाठी सज्ज झालेली दिसत होती. तर माथेरान सारख्या पर्यटन स्थळावर अगदी पारंपरिक पद्धतीने मोठ्या जलोषात जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला त्याचबरोबर माथेरान मधील दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकात गावातील तरुणाई एकवटलेली दिसत होती.

अगदी पारंपरिक पद्धतीने जन्माष्टमी साजरी करताना माथेरानच्या श्रीराम मंदीरात तसेच राधाकृष्ण मंदीरात अबाल वृद्ध, महीला वर्गाने लक्षणीय उपस्थिती दर्शवली होती. यावेळी श्रुश्राव्य भजनाचा लाभ घेत मध्यरात्री श्रींच्या जन्मावेळी पाळणा गीते सादर करण्यात आली. तसेच महाआरती करुन श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली.

यावेळी परंपरेनुसार जन्माष्टमीच्या मध्यरात्री राधाकृष्ण मंदीरात हंडी फोडून तर दुसर्या दिवशी श्रीराम मंदीरातील ग्रामस्थ मंडळाची मानाची हंडी फोडल्यावर गावातल्या इतर दहीहंड्या फोडल्या जातात. यावेळी माजी नगराध्यक्ष स्व. कुमारभाई चौधरी यांच्या स्मरणार्थ शिवसेनेच्या हंडी बरोबर नवरात्र उत्सव मंडळ, स्वाभिमान संघटना आणि पंचवटी मित्र मंडळ तसेच शिवमंदिर येथील ग्रामस्थ मंडळाची अशा अनेक दहीहंड्या फोडल्या गेल्या.यावेळी बाळगोपाळांनी डी.जे.च्या तालावर ठेका धरत आनंद उत्सव साजरा केला. यामुळे अवघे गोकुळ अवतरल्याचे चित्र दिसत होते.

उत्सवाला कोणतीही गालबोट लागु नये यासाठी आयोजकांकडुन विशेष काळजी घेण्यात आली होती. रुग्णवाहीका तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी नगरसेवक, नगरसेविका तसेच अनेक मान्यवर आणि बहुसंख्य नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत