माथेरानमध्ये बंदला शून्य प्रतिसाद ; माथेरानचे सर्व व्यवहार सुरळीत !

माथेरान : मुकुंद रांजाणे

राज्यात सर्वत्र मराठा समाजाला आरक्षण मिळणेकामी या समाजाने बंदची हाक दिलेली आहे. रायगड जिल्ह्यात सुद्धा काहीभागात कडकडीत बंद पुकारण्यात आलेला असताना रायगड जिल्ह्यातीलच माथेरान हे पर्यटनस्थळ बंद पासून दूर राहिले.
मराठा समाज इथे सर्वधिक असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर शून्य प्रतिसाद मिळाल्याने या समाजातील काही होतकरू तरुणांचा भ्रमनिरास झाला आहे. सर्व व्यवहार आणि दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल्स सुरळीत सुरू होते.त्यामुळेच आलेल्या पर्यटकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय झालेली नाही.
एरव्ही राजकीय दृष्ट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठा कार्डाचा मोठया प्रमाणावर वापर करून वेळप्रसंगी मतदारांना दबावतंत्र सुद्धा आणले जाते.परंतु भविष्यात मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर याचा लाभ सुद्धा या समाजाला प्राप्त होणार आहे. निदान एकदिवसीय बंद मध्ये माथेरान समाविष्ट करायला हवे होते असे संतप्तपणे तरुण वर्ग बोलत आहेत. काही अल्पसंख्याक लोक आपल्या न्यायाहक्कांसाठी माथेरान बंद ची हाक देतात त्यावेळी निमूटपणे गावकरी आणि आमचा मराठा समाज त्यावेळेस त्यांच्या बंदमध्ये सहभागी होतात परंतु स्वतःच्या न्यायाहक्कांसाठी इथल्या कानाकोपऱ्यात प्रस्थापित असलेल्या या समाजाने बंद न केल्यामुळे याच मंडळींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नगरपालिका निवडणुकीत आपल्या समाजाचा नगराध्यक्ष असावा हे अनेक वर्षांपासून या समाजाचे दिवास्वप्न आहे परंतु एकी नसल्यामुळे हे महत्वाचे पद यांच्या पारड्यात आजमितीपर्यंत वाटयाला आलेले नाही.या समाजाने अन्य जातीच्या मंडळींना नगराध्यक्षपद बहाल करण्यासाठी जीवाचे रान केलेले आहे. परंतु सर्वाधिक मतदार मराठा समाजाचे असताना राजकीय हमाली करण्या पलीकडे काहीच करू शकले नाहीत. ही बाब लाजिरवाणी असल्याचेही बोलले जात आहे.
समाजा विषयी संवेदना नसून आमचा मराठा समाज हा अन्य पक्षांच्या दावणीला बांधलेला आहे. निदान आरक्षण मिळत नाही त्याबाबत निषेधार्थ फलक अथवा मोर्चा काढण्यात सुद्धा आमची मंडळी अपयशी ठरलेली आहे.आरक्षण मिळाल्यास याचे फायदे भावी पिढीला प्राप्त होऊ शकतात.परंतु यांची मानसिकता नसल्याने अन्य उठाठेवी मध्येच अग्रेसर आहेत ही अत्यंत खेदाची म्हणावी लागेल.
योगेश जाधव मराठा समाज सक्रिय सदस्य माथेरान
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत