माथेरानमध्ये बिबट्याने म्हशीला केले फस्त!

माथेरान : मुकुंद रांजाणे

माथेरानमध्ये सध्यातरी हिंस्त्र प्राण्यांचा तळ कमी प्रमाणात असला तरी अधूनमधून माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात एखाद अपवाद वगळता काहीशी मोजकीच संख्या आढळते. त्यात चित्ता, बिबटया तसेच अन्य हिंस्त्र पशु  खाद्यासाठी दबा धरून बसलेले असतात आणि पायथ्याशी काही शिकार न मिळाल्यास ते थेट माथेरानच्या डोंगरावर चाल करून आपली शिकार यामध्ये भटकी कुत्री तसेच मोकाट गायी, रानातील वानर,माकडे यांवर हल्ला करून आपले भक्ष जाळयात ओढतात.
शुक्रवार दि.५ रोजी रात्रीच्या सुमारास येथील चारलेट बंगल्याच्या मागील बाजूस बिबट्या वाघाने म्हशीची शिकार केली आहे. आठ दिवसांपूर्वी या बंगल्याचे माळी विजय कळंबे यांच्या समोरून बिबट्या वाघ गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.

माथेरानचा हा चारलेट बंगला अमन लॉज रेल्वे स्टेशनवरील उत्तर बाजूस जंगलात उंच ठिकाणी एखाद्या जंगलाच्या गुहेप्रमाणे दडलेला आहे. या ठिकाणी  आजूबाजला घनदाट जंगल आहे तसेच सपाट मैदान आहे बंगल्याच्या आजूबाजूला  गवत भरपूर असल्याने शेजारीच असलेल्या गारबट गावातील धनगर समाजातीलकाही मंडळी म्हशी चरण्यासाठी नेहमीच इथे येतात. त्या म्हशी तेथील पाण्याच्या डबक्यात तासंतास गारव्यासाठी बसुन राहतात. शुक्रवारी रात्री पर्यंत ह्या एकूण चार म्हशी तिथे चरून बसल्या असताना अचानक बिबट्याने एका म्हशींला धरले व आपले सावज केले.

माथेरानला बिबट्या तसा दुर्मिळच परंतु वर्षातून एकदा तरी माथेरानच्या संपूर्ण परिसरात कुठेतरी तो  दिसतोच.परंतु मनुष्याला सहसा आजवर इजा पोहोचवलेली नसल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. माथेरानच्या जंगलात बिबट्या साठी लागणारे खाद्य  तसे सहसा काहीच नसले तरीसुद्धा येथे भेकर, ससा, कालिंदर, मुंगूस, रानडुक्कर, रानमांजर, माकड ,वानर ,शेकरू,असे प्राणी माथेरानच्या जंगलात असले तरी ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात व त्यांची संख्याही मर्यादित असते. त्यामुळे बिबट्या माथेरानच्या जंगलात आला की आपले खाद्य शोधत  तो गाव वस्ती ठिकाणीच येतो व आपले सावज टिपून हे बिबट्या वाघ पुन्हा काही महिने गायब होतात हे मागील बिबट्याच्या अशा शिकारींचा अनुभव बंगल्याच्या माळी कामगारांकडून ऐकावयास मिळत आहेत त्याप्रमाणेच शुक्रवारी रात्री बिबट्याने म्हशी ची शिकार केली आणी तो पुढील शिकारी साठी माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात पसार झाला आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत