माथेरानमध्ये स्वच्छतेचा बोजबारा!

माथेरान : मुकुंद रांजाणे

मागील वर्षी स्वच्छता अभियानात संपुर्ण माथेरान मधील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. परंतु हे अभियान हा केवळ एक दिखावा असून पुन्हा येरे माझ्या मागल्या हीच परिस्थिती सध्या सर्वत्र दिसत असल्याने सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे.
माथेरान हे एक सुंदर रमणीय पर्यटनस्थळ असून रायगड जिल्ह्यातील एक अग्रगण्य थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी असंख्य पर्यटक नियमितपणे भटकंती करण्यासाठी,मनाला आलेली ग्लानी, थकवा दूर करण्यासाठी येत आहेत. परंतु माथेरानच्या प्रवेशद्वारापासूनच दुर्गंधीयुक्त वासाने आणि घाणीमुळे त्यांचा भ्रमनिरास होत आहे. कुठे रस्त्यातच एखादया हॉटेलच्या ड्रेनेजचे दुर्गंधी युक्त पाणी वहात असते तर मुख्य बाजारपेठेच्या भागातील शतकी वाटचाल करणाऱ्या कपाडिया मार्केट मध्ये निष्क्रिय लोकांनी टाकलेल्या नासक्या भाजीपाल्यामुळे याही भागात अस्वच्छता दिसते आहे.
या संदर्भात विरोधी पक्ष नेते शिवाजी शिंदे आणि श्रमिक हात रिक्षा संघटनेचे सचिव तथा  प्राध्यापक सुनील शिंदे यांनी नगरपालिका प्रशासनाच्या गलथान आणि अनागोंदी कारभारा बाबतीत संताप व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी नगरपालिकेने कचरा उचलण्याची सोय सफाई कामगारांमार्फत केलेली असताना त्याचप्रमाणे कचरा वेचक महिलांकडून कचऱ्याचे संकलन केले जाते आहे तरीसुद्धा काही भागातील लोकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता दिसत नाही.तर नगरपालिकेचे काही कर्मचारी हे फक्त अधिकारी वर्गाच्या कायमस्वरूपी मागे फिरत असतात त्यामुळे कुणाचेही सहसा स्वच्छतेच्या बाबतीतही गांभीर्य दिसत नाही आणि कर्मचारी सुद्धा या बाबी गांभीर्याने घेत नाहीत.त्यामुळे यापुढे कुणीही रस्त्यावर अथवा आपापल्या प्रभागात कचरा टाकला.आणि प्लास्टिक  पिशव्यांचा वापर टाळला नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा पवित्रा विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी घेतला आहे त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.