माथेरान- कर्जत मिनीबसला अपघात चार जण जखमी..!

नेरळ-अजय गायकवाड
कर्जत एसटी आगारातील कर्जत-नेरळ-माथेरान मिनीबस ला आज दुपारी कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर किरकोळ अपघात झाला. मिडीबस पुढील वाहनचालकाने आपल्या वाहनाचा ब्रेक लावल्याने मिडीबस त्या वाहनावर आदळली आणि अपघात झाला असून या अपघातात दोन प्रवासी आणि मिनीबसचे चालक वाहक जखमी झाले आहेत.

माथेरान येथून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हि मिनीबस प्रवाशांना घेऊन कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्याने कर्जत कडे जात होती. चिंचवली-डिकसळ येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयाच्या समोर कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने गतिरोधक टाकले आहेत. त्या गतिरोधक यांच्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देणारे फलक तेथे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्या रस्त्याने पहिल्यांदा प्रवास करणाऱ्या वाहनचालक यांना डिकसळ भागात रस्त्यावर नव्याने टाकण्यात आलेले गतिरोधक यांची माहिती मिळत नाही आणि आज अगदी तसेच झाले. कल्याण रस्त्याने कर्जत कडे जाणारी इनोव्हा गाडीच्या चालकाने गाडीच्या समोर आलेले गतिरोधक बघून आपल्या गाडीचे ब्रेक करकचून दाबल्याने,त्यावेळी त्या मिनीबस च्या मागे असलेल्या माथेरान-नेरळ-कर्जत मिनीबसला अपघात झाला.आधी मिनीबस समोर असलेल्या इनोव्हा गाडीवर जाऊन आदळली आणि त्यामुळे मिनीबस समोरच्या झाडावर आदळली आणि हा अपघात झाला.

या अपघातात राज्य परिवहन महामंडळाच्या मिनीबस नुकसान झाले असून एसटी गाडीमधील चौघे  किरकोळ जखमी झाले आहेत.मिनीबस मधील आनंदी कुमार चौधरी तसेच अजित कोळी हे पर्यटक प्रवासी जखमी झाले असून गाडीचे चालक खैरे आणि वाहक महेंद्र तेली हे किरकोळ जखमी झाले आहेत.त्या सर्वांना तेथून काही अंतरावर असलेल्या रायगड हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे अशी माहिती कर्जत एसटी आगाराचे प्रमुख शंकर यादव यांनी दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत