माथेरान निसर्गाच्या रक्षणासाठी पर्यटक धावले, रन बडीज माध्यमातून मान्सून मॅरेथॉन

माथेरान : श्वेता शिंदे

माथेरानचे पावसाळी पर्यटन सुरु असताना अनेक ठिकाणांहून माथेरान मध्ये वर्षा ऋतुतील निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक तसेच धावपट्टुंनी रन बडी या संस्थेच्या माध्यमातून आयोजित मॅरेथॉन स्पर्धा २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान येथे तोबा गर्दी केली होती.यामुळे हा विकेंड अपेक्षे पेक्षा हाऊसफुल्ल झाल्याने येथील हॉटेल व्यावसायिक ,लॉजिंग तसेच छोटे मोठे व्यवसायिक यांच्या उदयोगधंद्यात कमालीची तेजी आली होती.

 

माथेरान निसर्गाच्या रक्षणासाठी पर्यटक धावले, रन बडीज माध्यमातून मान्सून मॅरेथॉन

माथेरान सारख्या निसर्गरम्य ठिकाणी हीरव्यागार अल्हादायक वातावरणात वरुणराज्याच्या साथीने माथेरान मधील सर्वात उंच ठिकाण असलेले पेमास्टर पार्क शेजारील अशोक हॉटेल येथे दि. ८ जुलै रोजी पहाटे ६ वाजता रन बडीस कल्ब, पुणे यांच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सह्याद्री पर्वत रांगेतील सुंदर पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचा निसर्ग अबाधित राहवा तसेच येथील पर्यटन वाढीसाठी वाव मिळावा या उद्देशाने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या आयोजनाचा मुळ हेतू “मेकिंग इंडिया रन” असा देखील आहे असे कल्बच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

या स्पर्धेचा शुभारंभ माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या शुभहस्ते झेंडा दाखवुन करण्यात आला. यावेळी गटनेते प्रसाद सावंत तसेच माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार डी पी दोरे , पोलीस शिपाई रुपेश नागे, महेंद्र राठोड, महीला पोलीस शिपाई अनघा पाटील तसेच रन बडीज कल्बचे अरविंद बिजवे, निखील शहा तसेच हरीष सॅलीयन यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली होती .यावेळी पावसाचा आनंद घेत पर्यावरणाचा संदेश देत देश विदेशातील धावपटुंनी ५, १०, २५, तसेच ५० की. मी. अंतर पार करत स्पर्धा यशस्वी केली.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी माथेरान पोलीस ठाणे तसेच माथेरान मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. यावेळी देश विदेशातील अनेक ठिकाणांहून आलेल्या धावपटू तसेच हौशी पर्यटकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत