माथेरान मध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सायकल रॅली.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दाखवला झेंडा ..!

नेरळ-अजय गायकवाड
                  महाराष्ट्र राज्यात पर्यावरण राखले जावे यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतुन माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे.माथेरान मध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सायकल रॅली काढण्यात आली,त्या रॅलीला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी झेंडा दाखवला. दरम्यान,राज्यातील सर्व शहरात सायकल रॅली काढली जात असताना माथेरान या वाहनांना बंदी असलेल्या शहरात सायकल फेरी न काढता दस्तुरी नाका येथे सायकल फेरी काढण्यात आली.
                पर्यावरण अबाधित राखण्यासाठी माझी वसुंधरा अभियान राबविले जात असून राज्य सरकार मधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू आहे.त्या अभियान अंतर्गत सायकल रॅली राज्यातील सर्व शहरात सायकल रॅली काढण्यात येत असून माथेरान गिरीस्थान नगरपरिषद कडून सायकल रॅलीचे आयोजन केले होते.माथेरान हे पर्यटन स्थळ पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असून माथेरान मध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनांना परवानगी नाही.त्यामुळे माथेरान शहरात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सायकल फेरी काढता येणार नव्हती.त्यामुळे माथेरानच्या दस्तुरी नाका येथील वाहनतळ परिसरात सायकल फेरी आयोजित केली होती.या सायकलफेरीला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी झेंडा दाखवला आणि सहभागी सायकलपटू यांनी सायकल दस्तुरी नाका येथून नेरळ आणि पुढे कर्जत पर्यंत जात पर्यावरण राखण्याचा संदेश दिला.त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सोबत पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे,मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे,रायगडचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी सुरेखा भणगे आदी उपस्थित होते.
                  माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित सायकल फेरीमध्ये आंतरराष्ट्रीय विक्रम करणारे सायकल पटू ऍड गजानन डुकरे हे आपल्या 9 वर्षाच्या मुलासह सहभागी झाले होते.त्याचबरोबर ऍड नरेश अहिर,ऍड सुमित कराळे तसेच अन्य सायकल पटू यांचा समावेश होता.या सायकलपटू यांचे कौतुक राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत