माथेरान मिनी ट्रेन शटल सेवेच्या सात फेऱ्या मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची घोषणा

माथेरान – प्रतिनिधी
लाखो आबालवृद्ध पर्यटकांचे विशेष आकर्षण आणि माथेरानची लाईफ लाईन असलेल्या मिनी ट्रेनच्या शटल सेवेच्या फेऱ्या पाच ऐवजी सात करण्याची घोषणा मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस के जैन यांनी केली .  नेरळ माथेरान मिनीट्रेन सेवा आणि माथरां मधील शटल सेवेच्या दृष्टीने रेल्वेची सुरु असलेली दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी   एस के जैन तसेच मध रेल्वेचे वरिष्ठ अभियंता आणि अन्य अधिकारी आज माथेरान ला आले  होते. यावेळी माथेरानचे  उप नगराध्यक्ष आकाश चौधरी माजी नगराध्यक्ष अजय सावंत नगरसेविका प्रतिभा घावरे माजी नगरसेवक दयानंद डोईफोडे ,प्रकाश सुतार  तसेच अन्य लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली . यावेळी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी यावेळी निवेदन दिले . माथेरानचा व्यवसाय पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असून  मिनी ट्रेन माथेरानच्या पर्यटनाचा मुख्य भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मोटार वाहनांना बंदी असल्याने  रेल्वे हेच प्रवासाचे मुख्य साधन असून   सध्या  सुरु असलेल्या शटल सेवे मध्ये वाढ करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली . यावर  सध्याच्या पाच फेऱ्यांऐवजी सात फेऱ्या करण्याची घोषणा करताना रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली . नवीन इंजिन प्राप्त होताच नेरळ माथेरान दरम्यानच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येईल असे  विभागीय व्यवस्थापक एस के जैन यांनी स्पष्ट केले . त्यामुळे विभागीय व्यवस्थापकांच्या आजच्या माथेरान भेटीमुळे  शटल सेवेच्या फेऱ्यांमध्ये झालेली वाढ माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला  उभारी देणारी ठरणार आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत