माथेरान वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार ! नागरिकांमध्ये संताप

माथेरान : मुकुंद रांजाणे

वाढत्या महागाईचा ससेमिरा पाठी असताना त्यातच आठवड्यातून शनिवार आणि रविवार याच दिवशी पर्यटनाच्या हंगामावर अवलंबीतअसलेल्या माथेरानच्या स्थानिक नागरिकांना दर महिन्यांला वाढीव वीज बिल भरून अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे संताप व्यक्त होत आहे.
जेष्ठ नागरिक संघटनेचे कोषाध्यक्ष अनंत शेलार यांच्या म्हणण्यानुसार दर महिन्याला वीज रीडिंग घेण्यासाठी कामगार येत असतात त्यांनी नमूद केलेली रीडिंग ही बिलात येत नसून वाढीव आकारणी येत आहे. त्याचप्रमाणे बिले भरून देखील नवीन बिलांत जुन्या बिलांची रक्कम समाविष्ट केली जात आहे. असे प्रकार सर्रासपणे वीज मंडळ करीत असून याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरत असून नेहमीच बिलांची रक्कम कमी करण्यासाठी कार्यालयाकडे खेटे मारावे लागत आहेत. त्यामुळे महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे.माथेरान मधील सर्वसामान्य नागरिक हे नेहमीच वेळेत वीज बिल भरत असतात त्यामुळेच वसुली सुद्धा चांगली होत आहे.यापुढे तरी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नाहक वाढीव बिले देण्याच्या घोडचूका करून जनेतला वेठीस धरू नये असे सर्व स्तरांतून बोलले जात आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत