माथेरान शटल सेवेचा उत्तम प्रतिसाद : पर्यटकांची गर्दी ;स्थानिकांचे व्यवसाय तेजीत

 माथेरान – मुकुंद रांजाणे 

माथेरानमध्ये काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून त्यामध्ये मनसोक्तपणे भिजण्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत. दस्तुरी नाका येथील अमन लॉज रेल्वे स्टेशन वरून गावात येण्यासाठी मिनिट्रेनची शटल सेवा रेल्वे प्रशासनाने पावसाळ्यात सुध्दा उपलब्ध केल्यामुळे येणाऱ्या सर्वच पर्यटकांना एक प्रकारे पर्वणीच ठरली आहे.
नेरळ माथेरान मिनिट्रेन पावसाळ्यातदरडी कोसळण्याची दाट शक्यता असल्याने बंद असते.त्यामुळे पर्यटकांना या प्रवासाचा आनंद उपभोगता येत नव्हता परंतु मोटारीने दस्तुरी नाक्यावर आल्यास पुढे पाच मिनिटांच्या अंतरावर अमनलॉज रेल्वे स्टेशन पासून तीन किलोमीटर गावात येण्यासाठी शटल सेवा उपलब्ध आहे त्यामुळे शनिवार, रविवार आणि अन्य दिवशी सुद्धा पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे. ही सेवा सुरळीत चालू राहण्यासाठी माथेरानच रेल्वेचे स्टेशन मास्टर गंगा सहाय मीना, आर.आर.चौधरी, (सी.टी.आई ) सुनील मिसाळ चालक, यादव(गार्ड),गजानन जोशी,शाम कराळे, अमर कांबळे तिकीट तपासणीस,मृत्युंजय कुमार (काटेवाला) ही रेल्वेतील कार्यरत मंडळी पर्यटकांना सेवा देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहेत.
पावसाळ्यात शटल सेवा सुरू असावी यासाठी आम्ही अन्य पक्षातील मंडळींना सुद्धा सोबत घेऊन वरिष्ठांना विनंती केली होती. इथे येण्यासाठी सोयीस्कर आणि सुरक्षित साधन म्हणजे मिनिट्रेन आहे. स्थानिकांसह, हॉटेल लोजिंग, तसेच अन्य मोलमजुरी करणाऱ्या श्रमिकांना याच माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळते. त्यासाठी ही शटल सेवा बाराही महिने उपलब्ध असावी जेणेकरून यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातदेखील भर पडेल. त्यावरून स्थानिकांना तसेच पर्यटकांना या सेवेचा लाभ मिळणे कामी शटल सेवा सुरू आहे आणि तिचा लाभ मोठया प्रमाणात पर्यटक घेत आहेत.
प्रसाद सावंत — गटनेते माथेरान नगरपरिषद
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत