माथेरामध्ये मुलींनी मारली बाजी ! अर्चना ढेबे प्रथम

 माथेरान : मुकुंद रांजाणे

दहावीच्या शालांत परिक्षेत याहीवर्षी मुलींनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.माथेरान सारख्या अतिदुर्गम भागात मुलींमध्ये यंदा प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान अर्चना नितीन ढेबे हिला एकूण ८७ ℅  गुण, द्वितीय क्रमांकावर हर्षाली विरेंद्र शिंदे ८६℅ आणि तृतीय क्रमांक खुशबू कमरुल खान ८४ ℅ गुण प्राप्त केले आहेत.शाळेचा एकूण निकाल ९७.४३ टक्के लागला असून सर्व पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.याबाबत अर्चना हिने सांगितले की माझ्या या यशात शाळेतील सर्वच शिक्षकवृंद आणि माझे पालक आहेत. मला नव्वद टक्क्यांपेक्षाही अधिक गुण प्राप्त करावयाचे होते परंतु यावेळेस ते शक्य झाले नाही. पुढील महाविद्यायीन जीवनात अधिकाधिक गुण कसे मिळतील यासाठी माझा निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे.
यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे यांनीही समाजाच्या वतीने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याचबरोबर निकीता वाघमारे, कोमल शिंदे यांचेही ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्याने खासकरून अभिनंदन केले आहे.
यावेळी त्यांच्या सोबत समस्त काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत