मानखुर्दमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

मानखुर्द परिसरात हार-फुलांची विक्री करणाऱ्या विधवेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. १५ आणि १६ जानेवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली असून, मानखुर्द पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे, तर पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मानखुर्द घाटकोपर मार्गावरून पीडित महिला मध्यरात्री एकटीच घरी चालली होती. एका कार्यक्रमात तिने मद्यसेवन केले होते. याच संधीचा गैरफायदा घेत अजय कांबळे, संदीप कांबळे या दोन तरुणांसह एक अल्पवयीन मुलाने तिला अडवले. तिघांनी तिला पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांच्या मागील बाजूस नेऊन लैगिक अत्याचार केला व पलायन केले. या धक्क्यातून सावरत घरच्या दिशेने जात असताना तिला अमोल निर्मल आणि प्रणय इंगळे या दोघांनी अडवले. त्यांनीही तिच्यावर अत्याचार केला. या दोघांचा प्रतिकार करत असताना ती जखमी झाली. तिच्या डोक्याला मार लागला. जखमी अवस्थेत ती रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी याबाबत कळवल्यानंतर मानखुर्द पोलिस रुग्णालयात पोहोचले व तिच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

महिलेने केलेले वर्णन व खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी आधी अमोल आणि प्रणय यांना अटक केली. अधिक चौकशीत यामध्ये आणखी तिघांचा समावेश असल्याचे समोर आले. त्यावरून अजय, संदीप आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. दरम्यान, पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत