मारहाण प्रकरणी कॉंग्रेस आमदार पुत्र पक्षातून निलंबित

 

(रायगड माझा ऑनलाईन)

बेंगळूरु- हॉटेलमध्ये एका व्यक्‍तीला मारहाण केल्याबद्दल कॉंग्रेस आमदाराच्या मुलाला आणि त्याच्या 10 मित्रांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. मोहम्मद हर्रिस नालपाद असे निलंबित केलेल्या आमदार पुत्राचे नाव आहे. तो शांतिनगर मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार एन.ए. हॅरिस यांचा मुलगा असून तो स्वतः बेंगळूरु युथ कॉंग्रेसचा सरचिटणीस आहे.

काल संध्याकाळी मोहम्मद आपल्या मित्रासमवेत एका हॉटेलमध्ये बसला असताना, तेथे विदवात नावाच्या एका व्यक्‍तीची त्यांच्याशी किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. मोहम्मद आणि त्याच्या मित्रांनी लाथा बुक्‍क्‍यांनी या व्यक्‍तीला मारहाण केली होती. याप्रकरणी दोषी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत