मालेगावच्या महापौरपदी काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या ताहेरा शेख यांची निवड

शिवसेना-काँग्रेस-भाजपची हातमिळवणी, मालेगावात सत्तेचा नवा पॅटर्न

मालेगाव :  महाराष्ट्र News 24

मालेगाव इथे चक्क शिवसेना – काँग्रेस आणि भाजपनं हातमिळवणी करत सत्ता स्थापन केलीय. काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या ताहेरा शेख यांची महापौरपदी निवड करण्यात आलीय तर उपमहापौर पदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड झालीय. महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तेचा एक नवा पॅटर्न इथे पाहायला मिळालाय.

मालेगाव महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना आघाडीकडून ताहेरा शेख यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता. ताहेरा शेख यांनी महागठबंधन आघाडीच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांचा २१ मतांनी पराभव केला. इथं, महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपनं काँग्रेस-शिवसेना आघाडीला साथ दिलीय. ताहेरा शेख यांना ५१ तर शान-ए-हिंद निहाल अहमद यांना ३२ मतं मिळाली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत