मावळ लोकसभा मतदारसंघातून अभिजीत आपटे हे इच्छुक उमेदवार

पुणे जिल्हा लोकसभा 2019 निवडणूकीसाठी इच्छूक उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया दिनांक १३ रोजी संपन्न

समाधान दिसले – खोपोली

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक 2019 च्या निमित्ताने पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने लोकसभा मतदार संघातील शिरूर, बारामती, मावळ लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छूक उमेदवारांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. ही नोंदणी प्रक्रिया दि.10/11/2018 ते दि.13/11/2018 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होती.

इच्छूक उमेदवारांनी आपल्या वैयक्तीक माहितीसह काँग्रेस भवन येथे आपली नोंदणी करावी असे आवाहन पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप यांनी केले होते. कॉग्रेस भवन पुणे येथे मावळ लोकसभा मतदारसंघातून अभिजीत आपटे यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांच्या सोबत चर्चा केली असून यावेळी मावळ तालुका अध्यक्ष बाळा ढोरे, कार्याध्यक्ष खंडु केदारी, चंद्रकांत  सातकर, लोणावळा शहर अध्यक्ष विलास बढेकर, आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत