मासेमारीसाठी नदीपात्रात टाकलेल्या विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

कर्जत  : अजय गायकवाड

 कर्जत तालुक्यातील भालीवडी ग्रामपंचायत हद्दीत  असलेल्या पेज नदीपात्रात  एक दुर्दैवी घटना घडली आहे. मासेमारीसाठी नदीपात्रात टाकलेल्या विद्युत प्रवाहाचा झटका लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यात आई वाडीलांसह मुलीचा मृत्यू झाला आहे. 

 
मिळालेल्या माहितीनुसार भालीवडी ग्रामपंच्यात हद्दीत असणाऱ्या फार्महाऊसवर  राहणारे सीताराम सोमा काटे (वय 50),  हिरा सीताराम काटे (वय 45), आणि सारिका सीताराम काटे (वय 17) हे याच परिसरातील एका फार्म हाऊसमध्ये रखवालदारीचे काम करत होते. इतर वेळेत हे कुटुंब मासेमारीचा काम करायचे. सकाळी जवळच असलेल्या पेज नदीपत्रामध्ये मासे पकडण्यासाठी त्यांनी विद्युत प्रवाह सोडला होता.  या प्रवाहाचा प्रथम सीताराम काटे यांना झटका लागला त्या वेळेस जोरात ओरडण्याचा आवाज झाला.या वेळी  वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीला व मुलीलासुद्धा विजेचा झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
हे कुटूंब भीमाशंकर येथील राहणारे असून भालीवडी ग्रामपंच्यात हद्दीत असणाऱ्या एक फार्महाऊस वर गेली कित्येक वर्षे मोल मजुरीचे काम करत होते. हे काम करत असताना नेहमीच काटे कुंटुबिय फावल्या वेळेत जवळच लागून असणाऱ्या पेज नदीपात्रात मासेमारी करत असत.
आज नेहमी प्रमाणे मासेमारीसाठी ते विजेचा वापर करत असल्याने ,या वेळी सुद्धा त्यांनी मासे मारी साठी विजेचा आकडा तयार केला होता. या वेळी पाण्याचा झटका लागला असता ,सीताराम काटे यांनी जोरात आवाज दिला.या वेळी घरातील पत्नीने आवाज ऐकला असता पत्नी आणि मुलगी वाचवण्या साठी पुढे धावून गेले असता त्यांनाही विजेचा जोरात झटका लागून त्यांचा मूर्त्यु झाला. त्यांना आणखी एक नऊ वर्षाचा लहान मुलगा आहे.तो या मधून थोडक्यात बचावला असून येथील ग्रामस्थ अजय पिंगळे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. या घटनेचा अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत