‘माही’वर ‘गंभीर’ आरोप

मुंबई: रायगड माझा वृत्त 

 इंग्लंडविरूद्ध झालेल्या वनडे मालिकेत भारताला पराभव स्विकारावा लागला. काल (मंगळवारी) झालेल्या निर्णायक सामन्यात आघाडी चे गडी स्वस्तात तंबूत परतले. कर्णधार कोहली बाद झाल्यानंतर धोनीने सूत्रे आपल्या हाती घेतली.त्याने हार्दिक पांड्याच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, फटकेबाजी करुन धावगती वाढवण्याच्या वेळी धोनीने निराशा केली. तो  ६६ चेंडूत ४२ धावा करुन बाद झाला. त्याच्या या संथ खेळीवरून त्याला अनेक जण ट्रोल करत आहेत. यात भारताचा फलंदाज गौतम गंभीरचा देखील सहभाग आहे.

धोनीच्या संथ खेळीने इतर फलंदाज दबावात खेळत असल्याचे मत गंभीने व्यक्त केले आहे. एका चॅनेलवरील मुलाखतीमध्ये गंभीर म्हणाला की, धोनीची मालिकेतील कामगिरी निराशाजनक आहे. आपल्या खेळाची सुरूवात तो डॉट बॉलने करतोे. त्याच्या या खेळीचा परिणाम इतर खेळाडूंच्या कामगिरवर होत आहे.  धोनीकडून आक्रमक खेळीची अपेक्षा असल्याचेही गंभीरने यावेळी बोलून दाखवले. एवढेच नाही तर इंग्लंडचा गोलंदाज आदिल राशिद आणि मोईन आली यांच्या खेळीने भारत पराभूत झाला नसुन धोनीच्या संथ फलंदाजीमुळे भारताला पराभव स्विकारावा लागला असा आरोपही गंभीरन धोनीवर केला.

जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 182 धावांच्या भागिदारीच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत