मिथुन चक्रवर्तीच्या कुटुंबियांना दिलासा नाही

हंगामी अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला 

मुंबई : रायगड माझा

बॉलीवूड व भोजपुरी चित्रपटांतील अभिनेत्रीवर बलात्कार, फसवणूक आणि बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती आणि पत्नी योगिता बाली यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी कलकत्ता न्यायालयाचे पूर्ण पिठाने हंगामी जामीना संदर्भात दिलेल्या निर्णयानुसार तत्पूरता अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणी घेण्यास पात्र नसल्याचे स्पष्ट करून फेटाळून लावला.

बॉलीवूड व भोजपुरी चित्रपटांतील अभिनेत्रे दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात महाक्षय चक्रवर्ती यांच्या विरोधात बलात्कार, फसवणूक आणि बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याची तक्रार केली. या तक्रारीची न्यायालयाने गंभीर दखल घेऊन महाक्षयसह मिथुन चक्रवर्तीची पत्नी योगिता बाली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे अटक होण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने या दोघांच्या वतीने दिल्ली न्यायालयात हजर राहण्यापूर्वी हंगामी जामीन द्यावा, अशी विनंती करणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला होता.

या अर्जावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील ऍड. ज्योती लोहकरे यांनी त्याला जोरदार विरोध केला. याची न्यायालयाने दखल घेताना कलकत्ता न्यायालयाच्या पुर्ण पिठाच्या निर्णयाचा आधार घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत