मिऱ्यावासीयांचा जेटी प्रश्न सोडवणार – निलेश राणे

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त 

रत्नागिरी-पांढरा समुद्र येथील मिऱ्या बंदरानजीक वाढविण्यात आलेल्या जेटीमुळे स्थानिक ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळावी म्हणून माजी खासदार निलेश राणे यांना रविवारी ग्रामस्थांनी मिऱ्या येथे बोलविले होते. यावेळी निलेश राणे यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल; असे सांगितले.

पांढरा समुद्र येथे मिऱ्या बंदरानजीक जेटी वाढविण्यात आली आहे. त्याचा त्रास स्थानिक नागरिक व मच्छिमार बांधवाना होत आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी या समस्या कडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे नागरिकातून नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. या पाहणी प्रसंगी स्थानिक नागरिक तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत