मी बघितलेले उध्दव ठाकरे हे नव्हेत : फडणवीस

कोल्हापूर : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

विश्वासघाती सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा एक पै चाही फायदा नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा वडिलांना शब्द दिला होता असे म्हणणाऱ्या ठाकरे यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता का अशी विचारणा करत मी बघितलेले उध्दव ठाकरे हे नव्हेत असा टोला फडणवीस यांनी लगावला. त्यांनी कोल्हापुरात सोमवारी सकाळी  पत्रकारांशी संवाद साधला.

एका विवाह समारंभाच्यानिमित्ताने रविवारी फडणवीस कोल्हापुरात आले होते. यावेळी ते म्हणाले, सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करतो अशी घोषणा करणाऱ्यांनी ‘यु टर्न’ घेतला आहे. आज अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असताना त्यांना ती दिली गेली नाही. सप्टेंबर २०१९ पर्यंतची मुदत घातल्याने अनेकजण यापासून वंचित राहणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. या सर्व बाबींविरोधात भाजप रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत राजकारणातून समाज विघटन करण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत. राज्याची आर्थिक स्थिती आम्ही असताना उत्तम होती. राज्य डबघाईला आले असल्याची चर्चा राष्ट्रवादी करते आणि आमच्यासोबत सत्तेत असलेली शिवसेना सुरात सूर मिसळते याचे आश्चर्य वाटते, असे ते म्हणालेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत