मी लोकप्रिय नेता, म्हणूनच माझ्यावर हल्ला- रामदास आठवले

मुंबई : रायगड माझा वृत्त

केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात लोकप्रिय असलेला दलित नेता आपण आहोत. म्हणूनच शनिवारी अंबरनाथ येथे आपल्यावर हल्ला झाला, असा आरोप केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज केला.

आपल्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात पकडलेल्या तरुणाची कसून चौकशी करून त्याच्यामागील सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेण्यात यावा. त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आठवले यांनी केली. यासंदर्भात पक्षाचे एक शिष्टमंडळ रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या कार्यक्रमांच्या ठिकाणी स्थानिक पोलीस ठाणे पुरेसा बंदोबस्त ठेवत नाहीत, असे आपल्या निदर्शनास अनेकदा आले आहे, असे सांगून आठवले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे लक्ष त्याकडे वेधण्यात येणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत