मी विरोधी पक्षात असताना तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना नालायक म्हणायचो-एकनाथ खडसे

जळगाव

मी विरोधी पक्षात असताना तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही लायक नाहीत, नालायक आहात असे म्हणायचो, असे प्रतिपादन भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.भुसावळ येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात भाजपा बुथप्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांची शुक्रवारी कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

मार्गदर्शनानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले, भाजपात अनेक लोक आले अन् मंत्रीही झाले. याबाबत मला बोलायचे नाही. कार्यकर्त्यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खडसे उद्विग्न होऊन म्हणाले की, मी मंत्री का झालो नाही हे मला आता कोणीही विचारू नका.

भाजपवर नेहमीच नाराजी व्यक्त करणारे भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या बैठकीत पुन्हा एकदा आपली नाराजी उघड केली आहे. मात्र यानंतरही ते म्हणाले, आगामी निवडणुकीत विजय भाजपचाच आहे. कार्यकर्त्यांनी भाजपची कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत. व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा. सुनील नेवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत