मुंबईः IIT च्या विद्यार्थ्याचा हॉटेलमध्ये मृत्यू

मुंबई : रायगड माझा वृत्त 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) चा विद्यार्थी जयदीप स्वैन हा मुंबईतील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला. मूळचा छत्तीसगडमधील असलेला जयदीप नुकताच मुंबईत आला होता. पोलिसांना हॉटेलच्या रुममध्ये कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही.

जयदीप स्वैन (वय २२) ने नुकताच मुंबई आयआयटीत प्रवेश घेतला होता. जयदीप सोमवारी जोगेश्वरी येथील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला. या ठिकाणी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. परंतु, त्याच्या मृतदेहाशेजारी खूप साऱ्या गोळ्या सापडल्या. तणाव दूर करण्यासाठी जयदीप गोळ्या घेत असावा किंवा गोळ्याचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा त्यात मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गोळ्या तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आल्या असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती अंबोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक भारत गायकवाड यांनी दिली.

आयआयटीच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या जयदीपने गावाला जात असल्याचे त्याच्या रुममेटला सांगितले होते. परंतु, तो गावाला न जाता शुक्रवारपासून हॉटेलमध्ये थांबला होता. दरम्यान, शनिवारी मुलासोबत बोलणे झाले होते त्यावेळी तो एकदम सामान्य वाटला, असे जयदीपच्या वडिलांनी पोलिसांशी बोलताना सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत