मुंबईची ‘कचराकोंडी’; सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद

मुंबई : रायगड माझा वृत्त

शहरातील कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचवण्याचे काम मुंबई महापालिकेने पूर्णपणे कंत्राटदारांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असल्याने सध्या कचरा उचलण्याचे काम करणारे पालिकेचे कायमस्वरूपी व कंत्राटी कामगार संतापले आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ कंत्राटी कामगारांनी आजपासून महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळं मुंबईची ‘कचराकोंडी’ झाली असून, तोडगा न निघाल्यास ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील कचरा उचलण्याची, साफसफाईची कामे कंत्राटदाराकडून करून घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बुधवारपासून हे काम सुरू झाले होते. मात्र, त्यामुळे गेल्या दहा-बारा वर्षांपासून काम करणाऱ्या शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. ‘कायम’ कर्मचाऱ्यांना इतरत्र सामावून घेण्यात येणार असले तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काय होणार, असा प्रश्न असून, त्याच संतापातून या सफाई कर्मचाऱ्यांनी मुंबईची ‘कचराकोंडी’ करण्याचा इशारा दिला होता.

कंत्राटी कामगारांकडून कचरा उचलणे बंद

शहरातील कचरा गोळा करून तो डम्पिग ग्राऊंडपर्यंत पोहचवण्याचे काम मुंबई महापालिकेने पूर्णपणे कंत्राटदारांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असल्याने सध्या कचरा उचलण्याचे काम करणारे पालिकेचे कंत्राटी कामगार संतापले आहेत. पालिकेच्या या निर्णयाला विरोध करत कंत्राटी सफाई कामगारांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. बोरिवली व दहिसरमध्ये गुरुवारी शेकडो कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. प्रशासनाने कंत्राटी कामगारांवरील अन्याय दूर न केल्यास शुक्रवारपासून मुंबईत कुठेही कचरा उचलणार नाही, असा इशारा कामगार संघटनांच्या बैठकीत देण्यात आला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत