मुंबईचे महापौर उपचारासाठी लीलावती रुग्णालयात

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

महापौरांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागते. मात्र गुरुवारी रात्री त्यांना उलटय़ा होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना परळ येथील पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या ते विश्रांती घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत