मुंबईतील आर्थर जेलमधे विजय माल्ल्याच्या ‘जंगी स्वागता’ची तयारी सुरु

मुंबई : रायगड माझा वृत्त 

गेल्या महिन्याभरापासून मुंबईतील आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातील बराक क्रमांक १२चे स्वरुप बदलण्यासाठीचे काम सुरू आहे. बराकमधील फरशी बदलण्यात आली असून भितींवरील रंगकामदेखील पूर्ण झाले आहे आणि बाथरुमचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. पण आता तुम्ही विचार करत असाल की एवढा थाट आणि जोरदार तयारी नेमकी कोणासाठी? तर ही सर्व जय्यत तयारी दुसरे-तिसरे कोणासाठी नाही तर बँकांना तब्बल हजारो कोटी रुपयांचा चुना लावणारा मद्यसम्राट विजय माल्ल्यासाठी सुरू आहे. दरम्यान, यापूर्वी बराक क्रमांक १२ मध्ये मुंबई २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आले होते.

विजय माल्ल्याने प्रत्यार्पणासाठी भारतीय कारागृहांची अवस्था वाईट असल्याचे सांगत विरोध दर्शवला होता, यासाठी कारागृह प्रशासनाकडून एवढी तयारी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास त्याला आर्थर रोड जेलमध्येच ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, यापूर्वीही आर्थर रोड कारागृहाच्या सुरक्षिततेच्या संदर्भातील अहवाल भारताकडून लंडन कोर्टाला सादर करण्यात आला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत