मुंबईतील चेंबूरमध्ये सेंट्रल प्लाझाला भीषण आग; इमारतीमध्ये 3 जण अडकल्याची भीती

मुंबई :रायगड माझा 

गोरेगाव येथे कोठारी हाऊस, सेंट्रल प्लाझा सिनेमाच्या इमारतीला आग लागली आहे. मुंबई अग्निशमण केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, ही आग लेव्हल 3 ची आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशमण दल पोहोचले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सोबतच या इमारतीमध्ये 3 जण अडकल्याची भीती आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनात अद्याप कुठल्याही जीवित हानी किंवा जखमींची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लेव्हल 3 आगीचा अर्थ काय?
फायर ब्रिगेड किंवा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून आगीच्या घटनेनंतर त्या घटनेला ठराविक लेव्हलमध्ये वर्गीकृत केले जाते. हे लेव्हल प्रामुख्याने नागरिकांच्या आणि तेथे राहणाऱ्या लोकांना सुखरूप हलवण्याशी निगडीत आहेत. लेव्हल 1 च्या आगीच्या घटनेत नागरिकांना घराबाहेर किंवा आग लागलेल्या इमारतीबाहेर पडण्यासाठी तयार राहण्यास सांगितले जाते. लेव्हल 2 च्या आगीत बाहेर पडण्यासाठी तयार राहा कुठल्याही क्षणी आपल्याला बाहेर पडण्यास सांगितले जाऊ शकते. आणि तिसऱ्या लेव्हलला नागरिकांना वेळीच म्हणजे, लगेच बाहेर पडण्यास सांगितले जाते. यात नागरिकांना आपले जीव वाचवण्यासाठी तातडीने इमारत रिकामी करावी लागते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत