मुंबईतील हॉस्पिटलमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांकडून पोलिसांच्या गाड्याची तोडफोड

मुंबई : रायगड माझा 

सायन येथील टिळक हॉस्पिटलमध्ये एका तरुणाचा उपाचारदारम्यान संशयास्पद मृत्यू झाला. मृत मुलाच्या नातेवाईकांनी आपला राग पोलिसांच्या गाड्यावर काढला. हॉस्पिटल परिसरात दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली.या घटनेत दोन पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे तीन जवान जंभीर जखमी झाले आहेत.

संतप्त जमावाने पोलिसांच्या तीन गाड्या फोडल्या आहेत. या प्रकरणी सायन पोलिसांनी 100 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला करण्यात आला.जखमी जवानांवर टिळक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.

मिळालेली माहिती अशी की, धारावी पोलिसांनी चोरीप्रकरणी येथील सचिन रवींद्र जैस्वार (वय-17 वर्षे) नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सचिनला बेदम मारहाण केली होती. त्याने गुन्हा कबुल केला नाही म्हणून त्याला शुक्रवारी त्याला सोडूनही दिले होते. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली म्हणून त्याचा नातेवाईकांनी शनिवारी टिळक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शनिवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान त्याचा अचानक मृत्यू झाला.

पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच सचिनचा मृत्यू झाल्याचा आरोप सचिनच्या वडिलांनी केला आहे.

पोलिस काय म्हणाले?

सचिनला लेप्टो स्पायरोसिस झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस खोटे सांगत असल्याचे म्हणत सचिनचे नातेवाईक आणि मित्रांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत