मुंबईत अचानक डेंग्यूचा उद्रेक!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी डेंग्यू या साथीच्या आजाराने मात्र आपले हातपाय पसरले आहेत. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचेच 213 रुग्ण मुंबईत आढळून आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने 15 ऑगस्टपर्यंतच्या जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन दिसते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबरमध्ये साथीच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या घटलेली दिसते. मात्र महापालिकेने 15 ऑगस्ट, 2018 पर्यंतची जाहीर केलेली आकडेवारी पाहता महिनाभरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढणे चिंताजनक मानले जाते. भरीस भर म्हणजे मुंबईत मलेरियादेखील जोरात आहे.16 सप्टेंबर 2018 पर्यंत 307 रुग्णांची नोंद झाली. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी असून, यावर्षी डेंग्यू, गॅस्ट्रो, हेपेटायटिस आणि कॉलरा रुग्णांची संख्याही घटली आहे. स्वाईन फ्लूचा मात्र एकही रुग्ण मुंबईत सापडलेला नाही. सप्टेंबरमध्ये डेंग्यू आणि लेप्टोमुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर या रुग्णांच्या परिसरात डेंग्यू किंवा लेप्टोचे रुग्ण शोधण्यात आले. चौघांना ताप आणि तिघांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले.

काय खबरदारी घ्याल?   

 ताप आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.श्वसनासंबंधी समस्या, उलटी, पोटात दुखणं, डोळे पिवळे होणे, नाक किंवा तोंडातून रक्त येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा.आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, कचरा, पाणी साचू देऊ नका.डास चावणार नाहीत याची काळजी घ्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत