मुंबईत चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या प्लान्टमध्ये मोठा स्फोट, कामगार अडकले

मुंबई : रायगड माझा वृत्त

मुंबईत चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या प्लान्टमध्ये मोठा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटाच्या आवाजाने माहुलगाव हादरलं असून अग्निशमन दलाच्या पाच गाडया घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

मुंबईत चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लान्टमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण माहुलगाव हादरलं असून अग्निशमन दलाच्या दहा गाडया घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. दुपारी तीन वाजता हा स्फोट झाला. रिफायनरमधील बॉयलरचा स्फोट होऊन आग भडकली.

बीपीसीएलचा अग्निशमन विभाग आणि मुंबई अग्निशमन दल ही आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या रिफायनरी प्लान्टच्या बाजूला झोपडपट्टीचा परिसर आहे. खबरदारी म्हणून या झोपडपट्टीतल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. माहुलमध्ये भारत पेट्रोलियमचे मोठे रिफायनरी प्लान्टस आहेत.

स्फोट झालेल्या ठिकाणी नेमकी किती जिवीतहानी झाली ते अद्याप समजू शकलेले नाही पण काही कामगार आग लागलेल्या ठिकाणी अडकले आहेत अशी माहिती शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी दिली.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत