मुंबईत जोरदार पावसाची हजेरी; रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत

मुंबई: रायगड माझा वृत्त 

मुंबई आणि उपनगरांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाला. दादर-हिंदमाता, किंग सर्कल, सायन आदी भागांत पाणी तुंबलं होतं. सायन येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. मध्य रेल्वेवरील लोकल २०-२५ मिनिटे उशिराने धावत होत्या.

मध्य आणि हार्बर रेल्वेवरील लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम दिसला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.  परिणामी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक १वर प्रवाशांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याची उद्घोषणा होत असली तरी, प्रत्यक्षात लोकल अर्धा तास उशिराने धावत होत्या. मुंबई, उपनगरांसह ठाणे, नवी मुंबईत मंगळवारी रात्रभर पाऊस कोसळला. आज पहाटेनंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी, मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. सायन येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत