मुंबईत थंडी नाही थंडावा, हे आहे कारण

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबईकरांना आज सुखद गारवा जाणवला. साखर झोपेत असणाऱयांना पहाटे आणि सकाळी थोडे उशीरापर्यंत गारेगार वातावरणाचा अनुभव आला. अनेकांनी मुंबईत थंडी आली हो… अशी आरोळीही ठोकली. पण,जरा थांबा ही थंडी नाही तर थंडावा आहे. कश्मीरमध्ये सध्यो मोठय़ाप्रमाणावर बर्फवृष्टी होत असून त्यामुळे मुंबईचे तापमान 3 डीग्री सेल्सियसने घसरले आहे. त्यामुळे मुंबईत सकाळच्या वेळी आणि संध्याकाळी गारवा जाणवत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मुंबईसह कोकणात सध्या उत्तरेकडून आलेले गार वारे धडकले आहेत. तसेच आर्द्रताही 70 ते 74 टक्के आहे. आर्द्रतेचे प्रमाणही घटल्यामुळे कोरडे वारे वाहात आहेत. त्यामुळे मुंबई गारेगार झाल्याचे कुलाबा वेधशाळेचे संचालक विश्वंभर सिंग यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत थंडी हातपाय पसरायला डिसेंबर उजाडेल असेही त्यांनी सांगितले. आज मुंबईत 32.8 डीग्री सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची तर 20 डीग्री सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

  • येत्या दोन दिवसात किमान तापमान आणखी 2 डीग्री सेल्सियसने घसरण्याची शक्यता आहे.
  • बंगालच्या उपसागरातील गाजा चक्रीवादळाचा मुंबईसह महाराष्ट्रावर कुठलाही परिणाम जाणवणार नाही.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत