मुंबईत पेट्रोल, डिझेल महागले !

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for पेट्रोल

गेल्या काही दिवसांपासून सतत घसरत असलेले पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा चढू लागले आहेत. मुंबईत पेट्रोल, डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात १० पैशांची तर, डिझेलच्या दरात आठ पैशांची वाढ झाली असून ते अनुक्रमे ७६.२५ व ६७.५५ रुपये प्रति लिटर झाले आहेत.

दोन महिन्यांपूर्वी नव्वदीपार पोहोचलेले इंधनाचे दर ऑक्टोबरपासून सातत्यानं घसरत असून त्यात तब्बल १६ टक्क्यांनी घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १५ तर, डिझेलच्या दरात प्रति लिटर १३ रुपयांची घट झाली होती. या घसरणीला आज ब्रेक लागला.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात होणारे चढ-उतार आणि रुपयांच्या विनिमय दराचा हा परिणाम आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत