मुंबईत रंगणार अंधांचे राष्ट्रीय क्रिकेट सामने

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन व रोटरी क्लब यांच्या विद्यमाने येत्या 14, 15 व 16 जानेवारीला अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सियाराम कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या लढती मुंबईत रंगणार आहेत. या स्पर्धेत आठ संघांमध्ये जेतेपदाची चुरस पाहायला मिळेल. यामध्ये यजमान महाराष्ट्रासह पंजाब, दिल्ली, गुजरात, छत्तीसगढ, ओडिशा, गोवा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. तीन दिवसांत तेरा सामने खेळवण्यात येणार असून इस्लाम जिमखाना व सचिवालय जिमखाना येथे लढतीचा थरार पाहायला मिळेल. स्पर्धेचा अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल. विजेत्या संघावर 21 हजार रुपयांचा वर्षाव करण्यात येणार आहे. प्रवीणकुमार पडवळ, अरुण भारसकर, राकेश अगरवाल, सशीकुमार, अर्जुन मुद्दा, शाम मखारिया यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडेल.

छत्रपती संभाजी महाराज नगर मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अंधेरी चषक’ या स्पर्धेला दणदणीत प्रतिसाद लाभला. माजी नगरसेवक शशिकांत पाटकर यांच्या सहकार्याने ही स्पर्धा दणक्यात संपन्न झाली. शशिकांत पाटकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. बक्षीस वितरण सोहळय़ाला युवासेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश सकपाळ, भाविसेचे आनंद फाटक तसेच रितेश सोलंकी, अमित जोशी, अजित सुर्वे या मान्यवरांची उपस्थिती होती. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे सतीश गवस, दीपक टेमगिरे, ललित पटवा, अजिंक्य मोकल व स्थानिक शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेतली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत