मुंबईत २८ जणांनी करून घेतले लिंग परिवर्तन

मुंबई – रायगड माझा ऑनलाईन टीम

बाह्यरूप स्त्रीचे पण भावना पुरुषाच्या किंवा शरीराने पुरुष पण मनाने स्त्री… अशा द्वंद्वात अडकलेल्या अनेकांना आपले बाह्यरूप बदलण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नाही. ‘आतला आवाज’ सतत साद घालत राहातो. हाच आवाज ऐकत आतापर्यंत मुंबईच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात २८जणांनी लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यात २१ पुरुष लिंग बदलून स्त्री झाले आहेत, तर सात स्त्रियांनी शस्त्रक्रिया करून पुरुष होण्याची इच्छा पूर्ण करून घेतली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत