मुंबई आयआयटीला १ हजार कोटींचा निधी : नरेंद्र मोदी

मुंबई: रायगड माझा वृत्त 

पायाभूत सेवासुविधांसाठी मुंबई आयआयटीला १ हजार कोटींचा निधी देण्याची घोषणा मोदी यांनी या कार्यक्रमात केली. आयआयटीत शिक्षण घेऊन जगभरात देशाचं नावलौकीक विद्यार्थी करत आहेत. त्यांचा हा उत्कर्ष असाच पुढे चालत राहावा असेही मोदी यावेळी म्हणाले.

मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात खुदीराम बोस यांना श्रद्धांजली वाहत केली. ६० वर्षांपूर्वी १०० विद्यार्थ्यांपासून आयआयटीने सुरू केलेला प्रवास आज १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहचल्याबद्दलही मोदी यांनी आयआयटी संस्थेचे अभिनंदन केले. आयआयटीचे डॉ. रमेश वाधवानी यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबाबतही मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

आयआयटीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी आणि विकासासाठी पुर्ण मदत करण्याचे आश्वासन देत, येणाऱ्या दशकात जगाचा विकास आयआयटी टेक्नॉलॉजी ठरवेल असे वक्तव्यही त्यांनी केले. आज भारत स्टार्टअप क्षेत्रात जगात दुसऱ्या स्थानावर आहेत. अशीच उत्तोरोत्तर प्रगती करत आपल्याला इनोवेटीव्ह इंडीया बनवायचं आहे . हा इनोव्हेटीव्ह भारत बनवण्याची जबाबदारी तरुणांच्या हातात आहे. त्यामुळे फक्त क्वान्टीटीच नाही तर क्वालिटी काम करण्यावर भर दिला पाहिजे असे पंतप्रधान मोदी या समारंभात म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत