मुंबई गेली खड्ड्यात…आरजे मलिष्काचं मुंबईच्या खड्ड्यांवर नवीन गाणं

मुंबई : रायगड माझा वृत्त

मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का? असं म्हणत गेल्या वर्षी पालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आरजे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मलिष्काचं खड्ड्यांवरचं गाणं सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

सैराट सिनेमातील झालं झिंग झिंगाट गाण्याच्या धर्तीवर मलिष्कानं ‘गेली गेली मुंबई खड्ड्यात’ गाणं तयार केलं आहे. सध्या हे गाणं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

अवघ्या काही तासांच्या पावसानं मुंबईची होणारी तुंबई, त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे होणारे हाल, यावर मलिष्कानं गाण्यातून भाष्य केलं आहे. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गेल्या वर्षी मलिष्कानं उपहासात्मक गाण्यातून बीएमसीवर निशाणा साधला होता. त्या गाण्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं मलिष्कावर जोरदार टीका केली होती. यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या.

त्यामुळे आता मलिष्काच्या खड्ड्यांबद्दलच्या गाण्याचे कसे पडसाद उमटणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत