मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तटकरेंनी घेतली नितीन गडकरींची भेट!

म्हसळा : निकेश कोकचा 

रायगड येथून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या विशेषतः पळस्पे ते इंदापूर दरम्यानचा सर्वात खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन अनेक लोकांचे बळी गेले असल्याची माहीती देखील दिली. सदर रस्ता दुरूस्तीची मागणी करुन या रस्त्याच्या कामाचे कंत्राटदार सुप्रीम कंपनीकडून हे काम तात्काळ काढून घ्यावे, अशीही मागणी यावेळी सुनील तटकरे यांनी केली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तटकरेंनी घेतली नितीन गडकरींची भेट!

रायगड हा कोकणातील पर्यटन आणि उद्योगधंद्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ रायगडातून जातो. पनवेल – इंदापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे पण ते कासवगतीने सुरू आहे. शेकडो माणसे या रस्त्यावर खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील इंदापूर – झाराप रस्त्यावरही भूमी अधिग्रहण आणि पुलांची कामे प्रलंबित आहेत. कोकणातील कोस्टल रोडचाही डी.पी. प्लॅन व सर्व्हे होऊनही पुढील कार्यवाही झाली नाही. महाराष्ट्र राज्य महामार्गासोबत निगडीत समस्यांबाबतही यावेळी गडकरी यांच्याशी तटकरे यांनी सविस्तर चर्चा केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत