मुंबई गोवा महामार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

माणगाव : प्रवीण गोरेगांवकर

मुंबई गोवा महामार्गाचे काम वेगात सुरु असले तरी अपघाताची मालीका कायम असून माणगावजवळ झालेल्या मोटार सायकल अपघातात 39 वर्षाचा युवक जागीच मृत्यूमुखी पडल्याची घटना ता. 5 जुलै रोजी गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास खरवली फाट्याजवळ घडली. मुंबई गोवा महामार्गावर गेल्याच आठवड्यात झालेल्या दुचाकी अपघातात ट्रकवर धडकून 20 वर्षीय तरूण मयत झाल्याची घटना घडली होती.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुर्यकांत चंद्रकांत माने वय 45 रा. करंजखोल ता. महाड हे आपल्या ताब्यातील मोटार सायकल क्र. एम. एच.06 बी.जे.1078 या मोटार सायकल वरून महाडकडे जात असताना गोवा येथून केमिकल पावडर घेऊन मुंबईकडे निघालेल्या ट्रक क्र. एम. एच.11 ए. एल. 3769 यांच्यात जोरदार धडक लागून झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वार सुर्यकांत माने यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की ट्रक ठोकरीनंतर रस्त्याच्या विरुध्द दिशेला जाऊन खड्यात गेला. अपघातात मोटारसायकल स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.