मुंबई-गोवा महामार्गावर चार वाहनांचा भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू;आठ जण जखमी

वाहनांच्या लांबच लांब रांगा, माणगाव तालुक्यावर दुखाचे सावट

नागोठणे: महेंद्र माने 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे जवळच सुकेळी खिंडीत शुक्रवार 02 जून रोजी सकाळी 10.00 वाजण्याच्या सुमारास चार वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीघांचा जागीच मृत्यू झाला व आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मॅक्सिमो, इरटीगा कार व मोटारसायकल या तीन वाहनांना ठोकर मारून अपघातातील ट्रक जवळच्या 30/35 फुट खोल असलेल्या कॅनलच्या पाण्यामध्ये कोसळला.

     नागोठणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार 02 जून रोजी रत्नागिरी येथून आंबा घेवून मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबई बाजूकडे भरधाव वेगात जाणारा दहा चाकी ट्रक क्र.MH 08 G 9912 हा नागोठणे पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जिंदाल कंपनीच्या पुढे सुकेळी खिंडीच्या उतारावर वेगात सकाळी 10.00 वाजण्याच्या दरम्यान आला असता ट्रक ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सूटल्याने मुंबई बाजूकडे जाणारा महिंद्रा कंपनीचा मॅक्सिमो क्र. MH 04 GM 7067,मारुती कंपनीची इरटीगा कार क्र.MH 06 BM 1751 व होंडा कंपनीच्या मोटारसायकल क्र. MH 06 BK 2455 या गाड्यांना पाठीमागून जोरात ठोकर मारून ट्रक कॅनल पुलाचा कठडा तोडून 30 ते 35 फुट खोल कॅनलच्या पाण्यात पडला.

या भीषण अपघातात मोटारसायकल वरील रघुनाथ दत्तात्रेय मारणे वय –28 वर्षे व राकेश बाळू राऊत वय- 27 वर्षे दोघेही राहणार वावे ता.माणगाव हे अपघात ठिकाणीच मरण पावले तसेच ट्रक ड्रायव्हर शाहरुख वय- 28 वर्षे रा. रत्नागिरी हा ट्रकच्या खाली पाण्यात दाबल्याने मरण पावला. तसेच शैलेश पाटील, चित्रा पाटील, ऋषिकेश पाटील (सर्व राहणार तुरबाडी-म्हसळा), अमोल म्हापुसकर, प्रचिती म्हापुसकर (रा.आदगाव-श्रीवर्धन),लक्ष्मण गोरेगावकर,संध्या गोरेगावकर (रा.इंदापूर), महमद युसुफ महमद युनूस शेख यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर जिंदाल कंपनीच्या रुग्णालयात प्रथोमोपचार करण्यात येत आहेत॰ महामार्गाचे चौपदरीकरणाचे रेंगाळलेले काम व जागोजागी करण्यात आलेले खोदकाम व भराव यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्या कारणाने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या अपघातात निष्पापांचा बळी जात आहे.

माणगाव तालुक्यावरती दुखाचे सावट कायम असून तालुक्यातील वावे येथील दिया या चिमुकलीच्या हत्येची घटना ताजी असतानाच आज झालेल्या या अपघातात वावे गावातील दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघाताचा तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय गोविंद कदम करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत