मुंबई -गोवा महामार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक गंभीर जखमी 

महाड : मयुरी खोपकर

मुंबई -गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू होण्याची घटना सोमवारी रात्री ८. ३० वाजण्याच्या सुमारास इसाने कांबळे गावाच्या हद्दीत घडली . या अपघातात दुचाकी चालविणारा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारांसाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.
नजिफ फलनायक रा. म्हाप्रळ जी. रत्नागिरी हा तरुण आपला सहकारी आमिर कोंडवकर रा. कुसगांव ता. महाड यांच्यासह एम एच ०८ यु ४५०४ या क्रमांकाच्या दुचाकीने पोलादपूर येथून महाडकडे येत होता. इसाने कांबळे गावाजवळ समोरून ओव्हरटेक करीत भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात आमिर कोंडिवकर  याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच मरण पावला. तर नजीफ फलनायक याचे दोन्ही पाय मोडल्याने त्याला अधिक उपचाराकरिता मुबंईतील जे जे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत