मुंबई – गोवा महामार्गावर लक्झरी बसची टेंपोला धडक

कोलाड : कल्पेश पवार

मुंबई – गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी रात्री 2 च्या सुमारास मुंबईहून राजापूरकडे जाणाऱ्या लक्झरी बस ने मालवाहू टेंपो वाहनाला कोलाड नजीक पुगाव हदित समोरा -समोर जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात टेंपो वाहन चालक गंभीर जखमी झाला असून बस चालक मात्र फरार झाला आहे.

 

याबाबत कोलाड पोलिसांनी दिलेल्या  माहिती नुसार टेंपो वाहन चालक आशिष भीतले वय ( 21 ) रा. शिवराज भवन मुंबई हे आपल्या ताब्यातील वाहन क्र (एम्.एच.०8.एच 1129. ) हे मुंबई -गोवा महामार्गावरून मुंबई कडे जात असताना ते कोलाड जवळील पुगाव हद्दीत शुक्रवारी रात्री 2 च्या सुमारास आले असता, त्याच वेळी महामार्गावरून भरदाव वेगाने मुंबई- राजापूर अशी जाणारी लक्झरी बस क्र. ( एम्.एच. 48 के. 7293 ) च्या वाहन चालकाने रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून आपले वाहन वेगवान चालून  रस्त्याच्या विरुद्ध दिशेला घेहून टेंपो वाहनाला समोरा – समोर जोरदार धडक दिली.  ही धडक एवढी भीषण होती की यात टेंपो चालक याच्या डोक्याला, हात पाय, तोंडास  गँभीर दुःखापत झाली, तसेच बस मधील अ.क. 2  ला डोक्यास दुखापत होऊन बस वाहन चालक  राहुल कुंभार रा. जोगेश्वरी मुंबई हे पोलिसांना अपघाताची खबर न देता पळून गेले आहे. जखमिंना अधिक उपचारासाठी पनवेल येथील इस्पितळात हलविण्यात आले आल्याचे समजते आहे.

सदर अपघाताची नोंद  कोलाड पोलिसांत करण्यात आली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. अपघाता चा पुढील तपास  कोलाड पोलिस करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत