मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात, छातीत सळ्या घुसून चालक जागीच ठार

पेण :रायगड माझा

मुंबई-गोवा महामार्गावर पेण येथील हॉटेल झी गार्डनजवळ बेदरकार वाहन चालवून झालेल्या विचित्र अपघातात चालक ठार झाला आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन वाहतूक सुरळीत सुरू केली.

मुंबई-गोवा महामार्गावर चालक गजेंद्र मिश्रा (वय ३१ रा. बिलोली, मध्यप्रदेश) हा ट्रेलरमधून (एमएच ४९/६७८६) सळ्या (गज) घेऊन भरधाव वेगाने जात होता. हॉटेल झी गार्डन परिसरात ट्रेलर आल्यानंतर भरधाव वेगातच चालक गजेंद्र यांनी ट्रेलरचा अचानक ब्रेक दाबला. अचानक ब्रेक दाबल्याने ट्रेलरच्या मागे असलेल्या लोखंडी सळ्या केबीनमध्ये येऊन गजेंद्रच्या छातीत घुसल्या. या अपघातामध्ये चालक गजेंद्र मिश्रा हा जागीच ठार झाला. सदर अपघाताची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत