मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; एक जागीच ठार

पनवेल : मनोज पाटील
मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. आज दुपारी 2 च्या सुमारास हा अपघात झाला आहे.  महेंद्र राजभर वय 39 (मूळ रा.मऊआइमा,अलाहाबाद, उत्तरप्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर मृत व्यक्ती ट्रकचा चालक असून गाडीतून उतरून (मुंबईकडील दिशेस) रस्ता ओलांडताना अपघात झाला असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अपघात झाल्यांनतर त्यावेळी तेथील कल्पेश ठाकूर यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या अपघाताची दादर सागरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत