मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दुपारी १२ ते २ दरम्यान बंद राहणार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for mumbai-pune expressway

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आज दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. एक्स्प्रेस वेवरील रसायनी ते माडप दरम्यान ओव्हरहेड गँट्रिज बसवण्यात येत आहे. याच कामासाठी ही वाहतूक बंद राहणार आहे. मात्र, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक जुन्या महामार्गावरून वळवण्यात येणार आहे.

दुपारी २ वाजता एक्स्प्रेस वे पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीचा ताण लक्षात घेता ओव्हरहेड गँट्रिज बसवण्याचं काम लवकरात लवकर उकरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी ६ सप्टेंबर या दिवशी खालापूर टोल नाक्याजवळ ओव्हरहेड गँट्री बसवण्यात आली होती. त्यावेळी देखील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक १२ ते २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत