मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातात, तिघांचा जागीच मृत्यू

रायगड माझा
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास कार आणि टेम्पोची धडक झाली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.
खालापूर टोलनाक्याजवळ कार आणि टेम्पोची जोरदार धडक झाली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून यात तीन जणांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. ही अपघातग्रस्त कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत