मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव कंटेनरची तीन वाहनांना धडक,चालक जखमी

लोणावळा : रायगड माझा वृत्त

 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर भरधाव कंटेनरची तीन वाहनांना धडक बसून विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एक चालक जखमी झाला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास किमी 45/700 जवळ हा अपघात झाला.

road accident at mumbai pune expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, चालक जखमी 

पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेल्या एका कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनरने समोर जाणार्‍या इनोव्हा गाडीला धडक दिली. त्यामुळे इनोव्हा गाडी समोर जाणार्‍या बीएमडब्लू कारला धडकली तर सदरचा कंटेनरअजून एका कंटेनरला धडकला. यामध्ये कंटेनरचा चालक काही वेळ गाडीत अडकला होता. अपघाताची माहिती समजताच खंडाळा महामार्गचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आयआरबी व देवदूत पथक यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला गाडीतून बाहेर काढले. अपघातग्रस्त वाहने बाजुला करत वाहतूक सुरु केली आहे. मात्र अपघातामुळे काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत