मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आंदोलकांनी सहा तास रोखून धरला!

लोणावळा : रायगड माझा वृत्त 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अखेर सुरु झाला आहे. जवळपास साडेसहा तासांनी एक्स्प्रेस वे सुरु झाला आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी तळेगावजवळच्या उर्से टोलनाक्यावर सकाळी साडेदहा वाजल्यापासून रास्तारोको केला होता.

परिणामी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन्ही मार्गाची वाहतूक दोन्ही दिशेने ठप्प झाली होती.महाराष्ट्र बंदमुळे आज वाहनांची संख्या कमी असल्याने वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होती. परंतु दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

पोलिस दिवसभर आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर साडेसहा तासांनंतर म्हणजेच पाचच्या सुमारास एक्स्प्रेस वे सुरु झाला.क्रांती दिनाचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांनी बंद पुकारला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत