मुंबई-पुणे महामार्गावर बसला भीषण अपघात 5 जण ठार; 30 जखमी

खोपोली: महाराष्ट्र News 24 वृत्त 

मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. खंडाळा बोरघाटा लगतच्या गारमाळ घाटातील वळणावर खाजगी प्रवासी बस पलटी झाल्याने या बस मधील पाच प्रवाश्यांचा मृत्यु झाला तर 24 जण जखमी झाले आहेतआज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातात बस रस्त्यावरुन काही फुट दरी गेली आहेसर्वज्ञा सचिन थोरात, स्नेहा जनार्दन पाटील, जनार्दन पाटीलसंजय शिवाजी राक्षे, आणि प्रमिला रामचंद्र मोहिते अशा पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहेमिळालेल्या माहिती नुसार ही खाजगी प्रवासी बस कराडहून मुंबईच्या दिशेने एक्सप्रेस वेला लागूनच असलेल्या जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील गारमाळ घाटातून खाली उतरत असताचा चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस रस्ता सोडून काहीशी खोल दरीत गेलीयामुळे झालेल्या अपघातात गाडीमधील एक लहान मुलीसह चार जणाचा मृत्यु झाला तर 24 प्रवासी जखमी झाले आहेतजखमीपैकी 13 जणांना गंभिर दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर एमजीएम हाँस्पिटल कामोठेपवना हाँस्पिटल सोमाटणेलोकमान्य हाँस्पिटल निगडीखोपोली हाँस्पिटल याठिकाणी उपचार सुरु आहेतमहामार्ग पोलीस यंत्रणादेवदूत पथकअपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांनी सर्व मयत आणि जखमी यांना बाहेर काढत जखमींना तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत